आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण; विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यापीठात कमवा शिका कारभाराबाबत आंदोलन करणाऱ्या विध्यार्थ्यांना चातुशृंगी पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. यानंतर विध्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडत कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील कमवा शिका योजनेचा कारभारावर या विद्यार्थ्यांकडून दुपारी आंदोलन करण्यात येत होते. दरम्यान कमवा शिका योजनेत घोळ झाल्याप्रकरणी यापूर्वी काही जणांवर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र अद्याप गुन्ह्यात एकालाही अटक करण्यात आलेली नाही. तर तपासही संत गतीने सुरू आहे.

त्यातच आज काही विद्यार्थी संघटना कडून कमवा शिकवा योजनेतील चाललेल्या कारभाराबाबत तसेच काही मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. मात्र त्यावेळी चतुशृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस तेथे आले. त्यांनी विध्यार्थ्यांना ओढून काढण्यास सुरवात केली. त्यामुळे गोंधळ झाला. यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व्हिलन्स (एलआयबी) कर्मचारी पिंगळे आणि आलेल्या कर्मचाऱ्यांनी काहीजणांना मारहाण केली. यानंतर एकच गोंधळ उडाला. विध्यार्थी चिडलेले पाहून कर्मचारी येथून निघून गेले. त्यानंतर विध्यार्थ्यांनी पोलीस ठाणे गाठले. तसेच कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतर विध्यार्थी निघून गेले.

याबाबत पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांना विचारले असता त्यांनी मारहाण झाली नाही. हे प्रकरण तिथेच मिटले आहे. विध्यार्थी आंदोलन करत होते. तसेच कुलगुरूंना जाऊ देणार नसल्याचे विद्यपीठाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार पोलीस गेले होते. यावेळी काही विद्यार्थी व विद्यार्थिनींना बाजूला करण्यात आले होते, अशी आमच्याकडे आली असल्याचे सांगितले. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शीने दिली आहे.