पोलीस उपनिरीक्षक मारहाण प्रकरणी न्यायालयाचा पोलिसांना ‘दणका’ ; खडक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फ्लेक्स काढण्यात येत असताना त्याला विरोध करत दोघांनी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांना बेदम मारहाण केली. आरोपींच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा पाहून न्यायालयाने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. ससून रुग्णालयाचा अहवाल पाहिल्यावर न्यायालयाने खडक पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविले. या प्रकरणी निर्णय देण्यासाठी न्यायालय रात्री साडेदहा वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील न्यायालयीन कक्षात थांबून होते.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पठाण यांनी हा निर्णय दिला आहे. प्रज्वल राजेंद्र बनकर (वय ३४) आणि दिगंत राजेंद्र बनकर (वय ३०, दोघे रा. भवानी माता मंदिर, भवानी पेठ) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, भवानी पेठेतील भवानी हार्डवेअर दुकानासमोर फ्लेक्स लावण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेचे कर्मचारी हा बेकायदा फ्लेक्स काढत असताना या दोघा भावांनी त्याला विरोध केला. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक गणेश भागवत माने यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बनकर भावांनी त्यांच्या शर्टची कॉलर पकडून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. दिगंत याने त्यांच्या छातीवर व तोंडावर हाताने ठोसे मारले. पोलिसांनी दोघांना पकडून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अटक केली. त्या दोघांना शनिवारी सायंकाळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पठाण यांच्या न्यायालयात हजर केले.

त्यावेळी न्यायालयाने पोलिसांचे विरुद्ध तक्रार असल्याबाबत आरोपीला विचारताच आरोपींनी रडतच पोलिसांवर अमानुष मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच, पोलिसांनी आरोपीची पोलीस कस्टडीची मागणी केली असता पोलिसांनी स्वत:ची ओळख न देताच आरोपीस मारहाण करण्यास सुरुवात केली असून पोलिसांद्वारा कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर न्यायालयाने आरोपीचे अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने त्यातील गांभीर्य ओळखून घडलेल्या प्रकारची तात्काळ दखल घेत आरोपीच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. तसे ससून रुग्णालयाला बंद लिफाफ्यात पत्र दिले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांची तपासणी करुन न्यायालयाला अहवाल सादर केला. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अहवाल पाहिल्यावर
न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून दोघांनाही न्यायालयीन कोठडी
मंजूर केली. आरोपीतर्फ अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड. हितेश सोनार, अ‍ॅड. निलेश वाघमोडे व दिग्विजय ठोंबरे यांनी कामकाज पाहिले.

महेंद्रसिंग धोनी एक ‘फिनिक्स’, ‘माही A To Z’ 

महेंद्रसिंग धोनी एक ‘फिनिक्स’, ‘माही A To Z’ (भाग – १)

महेंद्रसिंग धोनी एक ‘फिनिक्स’, ‘माही A To Z’ (भाग – २) 

महेंद्रसिंग धोनी एक ‘फिनिक्स’, ‘माही A To Z’ (भाग – ३)