इंदापूरात वाळु तस्कारांकडुन पोलीसाला मारहाण, वाळु तस्करांच्या दहशतीपुढे प्रशासन हतबल

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – खोरोची (ता.इंदापुर) येथील निरा नदीपात्रातुन बेकायदा वाळु उपसा करणार्‍या वाळु तस्कराची वाळुने भरलेली हायवा ट्रक अडवल्याचा राग मनात धरून अवैध वाळु चोरी रोखणारे पोलीस काँस्टेबल यांना मारहान करत, वाळुने भरलेल्या ट्रकसह व पोलीसाचा मोबाईल पळवुन नेणारे दोन आरोपी विरोधात पोलीस काँस्टेबल सुनिल बापूराव कदम यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

प्रविण संजय परिंचे व विनोद सावंत रा. खोरोची, ता.इंदापूर, जि.पूणे अशी आरोपींची नावे असुन फिर्यादीत म्हटले आहे की इंदापूर तालुक्यातील मौजे खोरोची येथील निरा नदीपात्रातुन वाळुचा बेकायदेशिर उपसा सुरू असल्याची खबर इंदापूर पो.काँ.सुनिल कदम यांना १३ डिसेंबर २०२० रोजी मीळाल्याने त्यांनी दोन होमगार्डस खोरोची येथील नदीपात्र परिसरात जावुन तपास केला असता खोरोची गावातील रस्त्याने एक वाळुने भरलेला पांढर्‍या रंगाचा हायवा ट्रक मीळुन आला.त्यावरील चालकास फीर्यादी यांनी ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव प्रविण परींचे असल्याचे सांगीतले.तर हायवा ट्रक विनोद सावंत यांचे मालकीचा असल्याचे सांगीतले.तेव्हां ट्रकच्या पाठीमागुन विनोद सावंत हा आला व फिर्यादी यांना ट्रक का थांबविला म्हणुन अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली.

फिर्यादी हे सदर घटनेचा प्रकार वरिष्ठांना फोनवरून कळवत असताना विनोद सावंत यांनी फिर्यादी यांचे हातातील मोबाईल हिसकावुन घेतला व त्यांचे शर्टाची काॅलर पकडुन त्याचे गालात, कानफटात चापट मारून खाली ढकलुन दीले व फीर्यादीचा मोबाईल बळजबरीने घेवुन त्याचे मोटारसायकलसह निघुन गेल्याची घटना घडली असुन यामध्ये वरील दोन आरोपींनी एक टाटा कंपनीचा पांढर्‍या रंगाचा हायवा ट्रक कींमत १५ लाख, त्यामधील वाळु ३ ब्रास कींमत ३० हजार व फिर्यादी यांचा विवो कंपनीचा मोबाईल १५ हजार असा एकुण १५ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल बळजबरीने पळवुन नेला असल्याबाबतची फिर्याद पो. काँ. सुनिल कदम यांनी इंदापूर पोलीसात दीली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.लातुरे हे करत आहेत.