सनी कांबळे  खून प्रकरण : पोलिसांचा टवाळखोरांना चोप

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईन

सांगली शहरातील माधवनगर रस्ता परिसरात गुंड सनी कांबळे याचा खून झाल्यानंतर पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी (दि.६) शहरातील विविध महाविद्यालय परिसरात थांबलेल्या टवाळखोरांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यावेळी अनेक तरूणांना पकडून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टवाळखोरांवर धडक कारवाईची मोहीम उघडली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64f1bf39-c988-11e8-8395-158f69ca98f0′]

गुंड सनी कांबळेचा बुधवारी खून करण्यात आला. गुंड रवी मानेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केलेल्या या खुनात महाविद्यालयीन तरूणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय हल्लेखोरांचे समर्थक अनेक ग्रुपचे सदस्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणने शुक्रवारपासून सांगली आणि कुपवाडमधील विविध ३५ ग्रुपच्या सदस्यांकडे चौकशी सुरू केली आहे. त्याशिवाय या विविध ग्रुपचे बहुतांश सदस्य महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मोहीम उघडली होती.
शनिवारी सकाळपासूनच शहरातील विविध महाविद्यालय परिसरात टोळके करून बसलेल्या तसेच फिरणार्‍यांकडे चौकशी करत त्यांना चांगलाच चोप देण्यात आला. यातील काहीजणांचा संशय आल्याने त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कार्यालयात नेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B009ZBCZWQ,B01M0505SJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’747eead9-c988-11e8-9796-975ba645529e’]

दरम्यान, शनिवारी निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, अमित परीट, युवराज पाटील, विनोद चव्हाण, सुनील लोखंडे, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दीडशे रुपयाची लाच घेताना कनिष्ठ लिपिकास अटक

दरम्यान, मृत गुंड रवी मानेचा प्रथम स्मृतिदिन साजरा करणार्‍या सांगली आणि कुपवाडमधील विविध ग्रुपची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्याशी संबंधित ग्रुपशिवाय इतर ग्रुपच्या सदस्यांकडे चौकशी करून त्यांच्यावरील कारवाई सुरूच रहाणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.