पोलिसपुत्रानेच मारला अधिकाऱ्याच्या घरावर डल्ला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ असलेल्या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या घराचे कुलूप तोडून दागिण्यासह मुददेमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर डी.बी.च्या पथकाने केलेल्या तपासात चोरी करणारा पोलिस अधिकाऱ्याचाच अल्पवयीन मुलगा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने गुन्हयाची कबुली देत काही दागिने व रोकड पोलिसांना काढून दिली.

तापी इमारतीत महिला उपनिरीक्षक दीक्षा लोकडे यांच्या घराचे कुलूप तोडून ७३ हजारांचा तसेच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्या उघडया घरातून २६ हजारांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. नंतर या प्रकरणी दीक्षा लोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस स्टेशनला भाग ०५ गुरंन २२३/१८ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरविली.

तपासात एका अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. हा मुलगा पोलिस अधिकाऱ्यांचाच मुलगा असल्याचे तपासातून समोर आले. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्यास बाेलन्याय मंडळासमोर उभे केले असता समज देऊन सोडून देण्यात आले.