शिक्षणमंत्र्यांवरील विद्यार्थ्यांचा संताप संपेना, पोलीस बॉईजने केला निषेध

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथील कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अयोग्य भाषेचा वापर करून अटक करण्याचे आदेश दिले होते. पोलीस बॉईज संघटनेने तावडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत क्रांती चौकात निदर्शने केली. याबाबत राज्यपालाकडे तक्रार करणार असल्याचे पोलीस बॉईज संघटनेचे रवी वैद्य यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात विद्याथ्र्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘तुमची औकात नसेल तर शिक्षण घेऊ नका, घरीच बसा नाही तर मिळेल ते काम करा’, असे उत्तर दिले होते. एवढेच नाही तर या विद्याथ्र्याला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तावडे यांच्या या कृतीचा पोलीस बॉईज संघटनेने निषेध केला.

क्रांती चौकात याबाबत निदर्शनेही करण्यात आली. बेजाबाबदार वक्तव्य करणाऱ्या शिक्षण मंत्र्यावर बालहक्क कायद्याखाली गुन्हा दाखल करावा, शिक्षण मंत्र्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणाची राज्यपालाकडे तक्रार करणार असल्याचे पोलीस बॉईज संघटनेचे रवी वैद्य यांनी सांगितले. या आंदोलनात सुनील पारखे, अक्षय वैद्य, आकाश सुरडकर, सागर बनसोडे, संग्राम मोरे, रवी कोलते, रोणीत जाधव, रंजीत जटावले, सागर भुक्कन, अक्षय तळेकर, विशाल हिवराळे, गणेश जाधव, आनंद सुसर, दत्ता सोनवणे, अनिकेत पगारे, रामेश्वर कुऱ्हाडे, जयदीप गायकवाड, प्रदीप पगारे, चेतन पाटील यांचा सहभाग होता.

Good News ! नाशिक – अहमदाबाद विमानसेवा १३ फेब्रुवारीपासून