2 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे ग्रामीण पोलिस दलामधील हवेली पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार मल्हारी दामू राऊत (वय-51, बक्‍कल नंबर 1238. रा. सर्व्हे नंबर 46/1, गणेशनगर, महंमदवाडी,पुणे) यांना 2 हजाराची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी खडकवासला डॅमजवळ रंगेहाथ पकडले.

पोलिस हवालदार मल्हारी दामू राऊत (वय-51, बक्‍कल नंबर 1238. रा. सर्व्हे नंबर 46/1, गणेशनगर, महंमदवाडी,पुणे) असे लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. राऊत यांनी बुधवारी सायंकाळी तक्रारदार यांच्याकडून 2 हजाराची लाच स्विकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, उपाधिक्षक जगदीश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक कांचन जाधव, अशोक शिर्के आणि एसीबीच्या पथकाने केली आहे. एक महिन्यापुर्वी तक्रारदार यांची मोटारसायकल स्लिप होवुन अपघात झाला होता. त्यावेळी तक्रारदार यांनी हॉटेल कोहिनूर डोनजे (सिंहगड) येथे गाडी लावली होती. काल (मंगळवारी) तक्रारदार यांनी त्यांची गाडी तेथून नेली. त्यावेळी हॉटेल कोहिनुरच्या मालकांनी पोलिस स्टेशनच्या हवालदार यांचा फोन देवुन तक्रारदारास त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. तक्रारदार हे हवालदार राऊत यांना आज भेटले असता त्यांनी गाडीचे कागदपत्र आणावयास सांगितली व पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांच्याकडून 2 हजाराची लाच घेतली. अधिक तपास एसीबीचे अधिकारी करीत आहेत. याप्रकरणी 35 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली आहे.