राखी पोर्णिमेच्या पुर्वीच झालेल्या चकमकीत ‘नक्षली’ बहिणीसमोर पोलिस ‘भाऊ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लहानपणी चोर पोलीसाचा खेळ सर्वजण खेळतात. मात्र छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात राखी पोर्णिमेच्या पुर्वीच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात एका जवानासमोर त्याचीच बहिण बंदुक घेत समोर आल्याची घटना घडली आहे. ही घटना एका चित्रपटाचे दृश्य असल्यासारखे वाटेल मात्र ही घटना वास्तवात घडली आहे.

सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलाला नक्षली छावणी असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे २९ जुलैला सुकमा जिल्ह्यातील बालेंगटोंग च्या जंगलांमधील नक्षलवाद्यांच्या छावण्यावर जवानांनी हल्ला केला. या हल्ल्यात नक्षलवाद्याच्या बाजुने महिला नक्षलवादी वेट्टी कन्नीने हल्ला केला. तर सुरक्षा दलाच्या बाजुने तिचाच भाऊ वेट्टी रामा उभा होता. बहिणीला पाहताच तो थांबला. मात्र त्याच क्षणी दोन्ही गटात चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. तर कन्नीने तिथून पळ काढला. या चकमकीत जिल्हा सुरक्षा बलाच्या १४० जवानांनी ही कारवाई पुर्ण केली.

वेट्टी रामा आणि वेट्टी कन्नी दोघेही भाऊ बहिण आहेत. दोघेही एकवेळी कुख्यात नक्षलवादी होते. मात्र रामाने मागील वर्षी आत्मसमर्पण केले. त्यापुर्वी रामाने कन्नीलाही समर्पण करुन मुख्य प्रवाहात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी तिने तो अमान्य केले. पुढच्यावेळी ती समोर आल्यास क्षणाचाही विलंब न लावता तिला गोळ्या झाडणार असल्याचे रामाने सांगितले. या चकमकीदरम्यान दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असल्याचे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सलभ सिन्हा यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त