राहत्या घरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कांदिवली भागातील राहत्या घरात चालविल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका महिलेस अटक करून तीन पीडित मुलींची सुटका केली. हि कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि. १०) रात्री कांदिवली पश्चिमेकडील सेक्टर नंबर २ मध्ये केली.

या कारवाईत एका महिलेस अटक करून तीन मुलींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारे चालविला जात होता वेश्याव्यवसाय :

या सेक्स रॅकेटचे ग्राहक अनेक दिवसांपासून ठरलेले संबंधित महिला व्हाट्सअ‍ॅपद्वारे वेगवेगळ्या मुलींचे फोटो तिच्या संपर्कात असलेल्या ग्राहकांना शेअर करत असे. त्यानंतर हवी असलेली मुलगी ग्राहक या महिलेच्या घरी जाऊन पसंत करत आणि महिलेच्या राहत्या घराच्या बेडरूममध्ये ग्राहकांना पाठवून वेश्याव्यवसाय चालवला जात असे. तीन पीडित मुलींसह ही महिला वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महिलेला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित ठिकाणाहून गुन्ह्यासाठी वापरले जाणारे अनेक मोबाईल फोन देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like