पोलिसांना अतिप्रदान झालेल्या रक्‍कमेची वसुली करता येणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य पोलिस दलातील पोलिस नाईक, पोलिस हवालदार आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) यांना अतिप्रदान झालेल्या रक्‍कमेची वसुली करू नये असे परिपत्रक विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी काढले असून त्याबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे.

पोलिस नाईक, पोलिस हवालदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) या पदावर पदोन्‍नती, कालबध्द पदोन्‍नती, अगाऊ वेतनवाढी, मानवीव तारीख इ. दिल्यानंतर वेतन निश्‍चिती करण्यात येते. त्यास वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदविल्यास त्यांची सुधारित वेतन निश्‍चिती करण्यात येते. सुधारित वेतन निश्‍चिती केल्यानंतर अतिप्रदान झालेली रक्‍क ही सदरहू पोलिस कर्मचारी सेवेत असताना किंवा सेवानिवृत्‍त झाल्यानंतर त्यांच्याकडून वसूल करण्यात येत होती.  यासंदर्भात काही पोलिस कर्मचार्‍यांनी उच्च न्यायालयात तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) येथे याचिका दाखल केली होती. शासनास देखील याबाबत मार्गदर्शन होण्यास विनंती करावी लागते.सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या खटल्यासंदर्भात एक निर्णय दिला आहे. त्यामुळे शासनाने अतिप्रदान झालेल्या रक्‍कमेची वसुली करता येणार नसल्याचे कळविलेले आहे.

आगामी काळात पोलिसांना अतिप्रदान झालेल्या रक्‍कमेची वसुली करू नये असे सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात आले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी याबाबत दि. 5 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढुन सर्व घटक प्रमुखांना तसेच इतर वरिष्ठांना याबाबत कळविलेले आहे. पोलिस शिपाई पदावर सलग काही वर्ष कर्तव्य बजाविल्यानंतर संबंधित पोलिस शिपायाची पदोन्‍नती पोलिस नाईक या पदावर होते. त्यानंतर पोलिस हवालदार आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर पदोन्‍नती होते. ही पदोन्‍नती काही वेळा रोखण्यात देखील येते. त्यामुळे काही पोलिसांनी रक्‍कम अतिप्रदान होते. आगामी काळात अतिप्रदान झालेली रक्‍कम संबंधित पोलिसांकडून वसुल करता येणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

परराज्यांतील लोंढ्याबद्दल न्यायालयानेही व्यक्त केली  चिंता

[amazon_link asins=’B07417987C,B00L8PEEAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’150f3c52-b283-11e8-a505-7b5c2f8d0804′]