Pune : जागेच्या वादातून महिलेला व तिच्या कुटुंबाला एका वर्षासाठी केले बहिष्कृत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जागेच्या वादातून एका महिलेला व तिच्या कुटुंबाला एका वर्षासाठी बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, हे प्रकरण सासवड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, जागेचा न्यायनिवाडा करण्यास नकार दिल्याच्या वादातून जातपंचायतीने महिलेसोबत तिच्या कुटुंबाला एका वर्षासाठी वाळीत टाकले. तसेच या कुटुंबाला १ लाख रुपये, ५ दारूच्या बाटल्या, ५ बोकड असा दंड शिक्षा म्हणून जातपंचायतीने ठोठावला. हा दंड न दिल्यास कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याबाबतसुद्धा बोलल्याची माहिती मिळत आहे.

You might also like