home page top 1

राजकीय महिलेवर अश्लिल टिका करणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेवर सोशल मिडियातून झालेल्या टिकाटिपणीतून पुण्यातील राजकीय कार्यकर्त्या असलेल्या महिलेवर अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे समर्थकांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95914bf1-ce9b-11e8-bd3e-232e198988a4′]

आसाराम सानप, सुनिल एन फड, मनोज मुंडे, पोपट फुंदे, सुशेन नागरगोजे, दादा कुटे, योगेश देवरे, ज्ञानदेव खेडकर, सॅम गदादे, शरद वाघ, महेश एन एम मुंडे, गणेश नागरे, श्रीकांत घोळवे, दिनेश मुंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमध्ये शरद पवार यांची नुकतीच जाहीर सभा झाली होती. या सभेत शरद पवार यांनी घोडा मैदान जवळ आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांच्यावर टिका केली होती. त्याला पकंजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधी त्यांच्या पक्षातली कुरघोडी थांबवावी. पक्ष एकजुट एकसंध कसा राहिल हे पहावे मग आम्हाला टक्कर द्यावी. गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी खुद्द पवारांना इथे यावे लागले  हेच आमचे यश आहे. ज्या पक्षातील नेत्यांमध्ये एकीच नाही ते आम्हाला काय टक्कर देणार? अशी टिका केली होती.

[amazon_link asins=’B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9cb5c1fa-ce9b-11e8-92c8-c3de9df4a2dd’]

त्यावर पुण्यातील महिला कार्यकर्ताने ताई स्वत: ला सावरा अशा प्रकारची पोस्ट केली होती. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मुंडे समर्थकांकडून या महिला कार्यकर्त्या ट्रोल झाल्या. त्यांनी राजकीय पातळी सोडली. त्यांचा कुटुंबाबरोबरचा फोटो टाकून त्यावर अश्लील कॉमेंट करण्यात आली असल्याने आपली राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्या मनास लज्जा उत्पन्न झाली व कुटुंबास मानसिक त्रास झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. सिंहगड रोड पोलिसांनी बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

108 क्रमांक डायल केल्यास आजपासून रुग्णवाहिका येणार नाही

Loading...
You might also like