10000 रुपयाची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाच्या बंदोबस्तात असताना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. नाशिक येथील पथकाने आज सायंकाळी कारवाई केली.

तोफखाना पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला पोलीस हवालदार पोपट रोकडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, अदखलपात्र गुन्ह्यात 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यावरून नाशिक येथील पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचला. रोकडे हा मोर्चात बंदोबस्तात होता.

बंदोबस्तास असताना त्याने 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक हरिश खेडकर हे करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/