अरे बाप रे ! पोलिसच जुगार खेळताना पकडला गेला तो पण ठाण्यासमोर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस अधीक्षकांच्या पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता एक धक्कादायक बाब पोलिसांच्या निदर्शनात आली आहे ती म्हणजे ज्यावेळी पोलिसांनी ही धाड टाकली त्यावेळी त्या ठिकाणी सहायक पोलिसच जुगार खेळताना आढळून आला आहे त्यामुळे संपूर्ण पोलीस दलाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यामध्ये सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह जुगाऱ्यांना पकडण्यात आले. वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस ठाण्याच्या बाजूलाच खुलेआम जुगाराचा अड्डा सुरु होता. त्यामुळे रविवारी रात्री औरंगाबाद पोलिसांनी अचानक या अड्ड्यावर छापा टाकला असता हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

औरंगाबाद पोलिसांना शाहरुख टी स्टोलमध्ये काही जुगारी जुगार खेळात असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान वीरगाव पोलीस स्टेशनमधील फौजदार हनुमान पालेपवाड हे देखील या ठिकाणी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जुगार लावणाऱ्याकडून रोख रकमेसह, जुगाराचे साहित्य व मोबाइल असा ऐकून नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाचही जुगार खेळणाऱ्याविरोधात वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस कर्मचारीच या ठिकाणी जुगार खेळताना आढळल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या अड्ड्याला पोलिसांचेच अभय होते का ? असा सवाल देखल आता उपस्थित झाला आहे त्यामुळे आता याबाबतच्या सर्व प्रकारावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com 

You might also like