पोलिसांनी ‘मंत्र’ मारून पकडली ६ भूत

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन

गुन्हेगारी कमी करणाऱ्या पोलिसांना आता भूतं पळवण्याचे काम करावे लागले. चंद्रपूर शहराच्या बल्लारपूरकडे जाणाऱ्या कोळसा खाणीच्या किर्र जंगलातून जाणारा मार्ग आहे. या मार्गावरुन रात्रीच्या ड्युटीसाठी जाणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. परंतु मध्यंतरी या मार्गावर भूत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. हे भूत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या एकदम समोर येते. या भूतामुळे नागरिक या ठिकाणाहून जाण्यास घाबरु लागले. याची कुणकुण पोलिसांना लागली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31bce580-cae3-11e8-9793-0186979128ff’]

पोलिसांनी या मार्गावरील झाडीत सापळा रचून खऱ्या भुतांना पोलीसी मंत्र दिला. ही भूत म्हणजे ११ वी १२ वीत शिकणारी सहा मुल होती. ही मुल येथून जाणाऱ्या नागरिकांना घाबरवून त्यांचे व्हिडीओ बनवत होती. पोलिसांनी या भूतांना ताब्यात घेून तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्यासमोर त्यांना समज दिली. पोलिसांच्या मंत्राने या मुलांनी पुन्हा असे काही करणार नसल्याचे सांगितले.

[amazon_link asins=’B07G5BTYC2,B014CLL3KS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c98036ec-cae3-11e8-84af-a1cfff61fe07′]

वाघ-बिबटे-वन्यजीवांचे भय असलेल्या एका मार्गावर ६ अल्पवयीन मुले भुताचा वेष धारण करून लोकांना घाबरवत होते आणि त्याचा व्हिडिओ देखील तयात करत होते. यूट्युबवर प्रभावित होऊन Ghost Prank बनवण्याचं त्यांनी ठरवलं. ही सहाही मुले ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी आहेत. आणि गावाकडून शहरात शिक्षणासाठी आली आहेत. काही दिवसांपूर्वी या मुलांनी Ghost Prank करण्याची शक्कल लढवली. विशेष म्हणजे या थरकापाचे चित्रीकरण मोबाईल मध्ये केले जात होते.


अतिउत्साहाच्या भरात आणि लवकर प्रसिद्ध होण्याच्या हव्यासात या मुलानी हा धोकादायक मार्ग निवडला. या मुलांनी झाडांच्या आडून थेट समोर येत अनेक दुचाकीस्वारांना घाबरविले आणि या थरकापाचा आसुरी आनंद घेतला. दुचाकीस्वार भीतीने अपघातग्रस्त होईल, एखाद्याचा जीव जाईल याची देखील तमा या अल्पवयीन मुलांनी बाळगली नाही. हा प्रकार सुरू राहिल्यावर कुणीतरी शहर पोलिसांना याची माहिती दिली. यातील गांभीर्य पाहून अधिक कुमक पाठविण्यात आली. पोलिसांनी सावध पवित्रा घेत घटनास्थळ गाठले आणि अल्पवयीन भूतांना थेट ठाण्यात नेले. ठाण्यात या भूतांना तब्बल ३ तास योग्य समज देण्यात आली. आणि त्यांच्या स्थानिक पालकांना बोलावून भविष्यात चांगल्या वर्तनाची हमी देत घरी सोडण्यात आले.
[amazon_link asins=’B071JWBFDT,B01KSXQNLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’789b0749-cae4-11e8-b0c9-6dc9dce09bbb’]

तरुण पिढीने नागरिकांच्या जीवाशी बेतेल असे कोणत्याही प्रकारचे भुताचे फ्रँक करुन नये. जर अशी कोणतीही घटना नागरिकांच्या नजरेस येत असेल किंवा कोणी अशा प्रकारचे कृत्य करत असले तर त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच याशाप्रकरारचे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पोलिसांनी सांगितले.