एक हजाराची लाच स्विकारताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जप्त केलेल्या रिक्षावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी एक हजार रूपयाची लाच स्विकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी करण्यात आली आहे.

दिनेश शेडजी चव्हाण (पोलिस शिपाई, बक्कल नं. २४८०, नेमणुक – भद्रकाली पोलिस स्टेशन, नाशिक शहर) असे लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. चव्हाण यांनी एक अ‍ॅटोरिक्षा जप्त केली होती. त्यावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी त्यांनी चालकाकडून एक हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने चालकाने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पथकाने सापळा रचला. सरकारी पंचासमक्ष पोलिस कर्मचारी चव्हाण यांनी तक्रारदार चालकाकडून एक हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस उप अधीक्षक दिनकर पिंगळे यांनी पोलिस कर्मचारी चव्हाण यांच्यावर कारवाई केल्याचे सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –