दिवाळी पोलिसांची… कोणी वृद्धाश्रमात तर कोणी मुलाची सुटका झाल्यानंतर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – आपल्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांची दिवाळी ही पोलीस ठाण्यातच होते. सर्व जण सुट्ट्या असल्याने मोठ्या उत्साहात सण साजरा करत असतात. अश्या वेळी पोलीस मात्र कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तत्परतेने काम करतात. यातूनच वेळ काढून आणि समाज प्रबोधन होईल अशी ही दिवाळी पोलीस करतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अश्याच प्रकारे दिवाळी साजरी झाली आहे. कोणी वृद्धाश्रमात वडीलधाऱ्यासोबत तर कोणी अपहरण झालेल्या मुलाची सुटका झाल्यानंतर पोलीस ठाण्यात मिठाई वाटून आणि फटाके फोडून दिवाळी साजरी केली. वाहतूक पोलीस आणि विशेष मुलांनी वाहन चालकांना हेल्मेट घालणे किती गरजेचे आहे याचे प्रबोधन करत पंत्या दिल्या.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षीय सुफियान खान याचे अपहरण झाले होते. वाकड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथके शोध घेत होते. दरम्यान सुफियान याचे अपहरण पाच लाखासाठी केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अंत्यत गोफणीय पध्द्तीने तपास सुरू केला. वाकड पोलिसांनी आणि तपासी पथकाच्या टीमने योग्यरीत्या नियोजन केले आणि तीन दिवसानंतर सुफियान याची सुखरूप सुटका केली. तर दोन अपहरणकर्त्यांना अटक केली. लक्ष्मीपूजन दिवशी संध्याकाळी वाकड पोलिसांनी त्या मुलाची सुखरूप सुटका करून पोलीस ठाण्यात आणले. गेली चार दिवस सुफियानच्या शोधात असणाऱ्या वाकड पोलिसांनी यशस्वी कामगिरी झाल्याने सुटकेचा निःस्वाव सोडला. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांना, त्याच्या पालकांना मिठाई चारली तसेच त्या मुलासोबत फटाके फोडून आंनद व्यक्त केला.

तपासासाठी वाकडचे ५ अधिकारी आणि ३० कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे ४ अधिकारी आणि २० कर्मचारी शोध घेत होते. अश्या ऐकून वाकड पोलिसांच्या ५ टीम तर गुन्हे शाखेच्या २ टीम मुलाचा शोध घेत होत्या. अखेर मुलाला सुखरूप सोडवण्यात वाकड पोलिसांना यश आले. त्यामुळे पोलिसांचे कौतुक खान कुटुंबीयांकडून होत आहे.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी अनोख्या पध्द्तीने दिवाळी साजरी केली. पोटाला चिमटे देऊन आपल्या मुलांना वाढवले आणि त्याच मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले अश्या आई वडिलांसोबत मुगळीकर यांनी दिवाळी साजरी केली. चिंचवड येथील मदर तेरेसा वृद्धाश्रमात त्यांनी सर्वांना दिवाळीचे फराळ, मिठाई वाटप, खाऊ खातले. तसेच सर्वांची आपुलकीने विचारपूस केली. बंदोबस्त आणि नागरिकांची सुरक्षा यामुळे घरी जाता येत नसल्याने भोसरी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारात दिवाळी साजरी केली.

वाहतूक शाखेच्या हिंजवडी विभागाचे निरीक्षक आणि त्यांच्या टीमने विशेष अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करत एक चांगला संदेश वाहन चालकांना दिला. श्री साई विशेष अनाथ मुला मुलींचे वसतिगृह येथील मुलांनी स्वतःच्या हाताने तयार करण्यात आलेल्या पणत्या वाहन चालकांना वाटण्यात आल्या. पोलिस निरीक्षक म्हसवडे यांच्या टीमसह ही मुले डांगे चौकात वाहन चालकांना हेल्मेट घालून आपल्या जीवनाच्या पणतीची वात नेहमी पेटत ठेवा असा संदेश देत होते.