पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घडणाऱे गंभीर गुन्हे व आगामी निवडणूकांचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडल पाचमधील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यावेळी पोलिसांना रेकॉर्डवरील १५५ गुन्हेगार मिळून आले. तर तडीपारीच्या काळात शहरात आलेले व कोयते बाळगणारे, पिस्तूल बाळगणारे व पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी मिळून आले. अशी माहिती परिमंडल पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणूकांच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने परिमंडल पाच अंतर्गत येणाऱ्या वानव़डी, मुंढवा, ह़डपसर, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या देखरेखीखाली कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. हे कॉम्बिंग ऑपरेशन मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्यानंतर बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले. त्यावेळी या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे गुन्हेगार, जबरी चोरी, चोरी, घरफोडी करणारे, तडीपार, पाहिजे असलेले, फरार, व दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले आरोपी यांचा शोध घेण्यात आला.
त्यावेळी पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ४७९ आरोपी तपासण्यात आले. तर त्यापैकी १५५ आरोपी मिळून आले. तसेच अभिलेखावरील शुभम पवार (२१), शेखर चन्नाप्पा शइंगे (२६) शिवराज माने (२९) या तिघांकडे कोयते मिळून आल्याने त्यांच्यावर आर्म्स अक्टनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आले आहेत. तर कोंढवा पोलीस ठाण्यातील तडीपार संदिप करूल (२५) व मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश ठाकूर (२५) हे दोघे तडीपारीच्या कालावधीत आढळून आले. त्या दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर घरफोडीच्या गुन्ह्यातील व़ॉन्टेड असलेला तिलकसिंग गब्बरसिंग टाक (२७) याला अटक कऱणअयात आली.
अप्पर पोलीस आय़ुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व दोन सहायक पोलीस आय़ुक्त, ४३ अधिकारी, १५५ कर्मचारी यांच्या पथकाने केली.