हेल्मेट सक्ती ! पोलिस आयुक्त आग्रही, 11 महिन्यात 81 कोटींचा दंड पण 59 कोटींची वसुली बाकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अक्षय फाटक) – ”हेल्मेट” घालणे हा आमचा जन्म सिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो वाहतूक विभागाच्या कारवाईच्या ” रेट्या ” मुळे मिळवलाच अशीच म्हण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. कारण, आकरा महिन्यात ” सतर्क” पुणे पोलीसांच्या वाहतूक विभागान तब्बल 81 कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे पुणेकरांना हेल्मेट घालण्यास लावलेच ना असेच पोलीस गंमतीत बोलू लागले आहेत. तर, कारवाईच्या आकडेवारीन पोलीसांनीही तोंडात बोटे घातली आहेत. बर, इतक होऊनही आयुक्तांना मात्र एक प्रश्न सतावत आहे अन तो म्हणजे, ” पेंडीग” दंड वसूल कसा करायचा. कारण, निम्याहून अधिक दंड पुणेकरांकडेच आहे.

मुंबई-दिल्लीला पुण्याच्या वाहतूकीने मागे टाकले आहे. दिवसेंदिवस वाहतूकीचा विळखा वाढत चालला आहे. ही कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पण, त्याहून अधिक प्रयत्न शिस्तमय पुणेकरांना वाहतूकीची शिस्त लावण्यासाठी केले जात आहेत, असेच दिसत आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर हेल्मेट सक्तीबाबत आयुक्तांनी मौन बाळगले. पण, काही दिवसांतच वाहतूक विभागाची पुर्ण फौजच रस्त्यावर उतरवून हेल्मेट कारवाईचा धडाका लावला. पुणेकर हेल्मेट सक्तीविरोधातले, मग वाहतूक पोलीस अन पुणेकरांची ” चकमकी” उडायला सुरूवात झाली. वाहतूक विभाग घोळक्यानेच कारवाई करू लागले. त्यामुळे पुणेकरांना वाहने वापरण्याचीही भिती बसली. घोळक्याच्या कारवाईसोबतच तिसर्‍या डोळ्यातून म्हणजेच सीसीटीव्हीतूनही कारवाई सुरु होती. दररोजच्या या कारवाईने पुणेकरांनी मात्र, बेजार झाले.

त्यातच मध्यंतरी ” आमदारकीचे इलेक्शन” आले आणि पुणेकरांना आम्हीच यातून सोडवणार असे म्हणत काही आमदारांनी थेट ” मुख्यमंत्र्यांकडे” पोलीसांचे गर्‍हाणे मांडले. तत्कालीन मुख्यंमत्र्यांनीही रस्त्यावर उभाराहून कारवाई न करता तंत्रज्ञानाचा वापरकरून कारवाई करा, असे आदेश दिले. त्यानंतर काही प्रमाणात ही कारवाई थंडावली. इलेक्शेनचे वारे असल्याने कारवाई थंडावली. पोलीसांनीही हात आकडता घेतला. पण, इलेक्शेन पार पडताच पुन्हा या हेल्मेट कारवाईने जोर धरला असून, कारवाई तेजीत सुरू झाली आहे.

पुणेकरांचे नेते म्हणा किंवा प्रतिनिधित्व करणारे आता कुठे गेले अशीच म्हण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. कारण, पुणे पोलीसांच्या वाहतूक विभागाने जानेवारी ते नोव्हेंबर या आकरा महिन्यात केवळ अन केवळ हेल्मेटच्या कारवाईतून तब्बल 81 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

100 कोटींचा टप्पा पार करायचा…

डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे या वर्षात (2019) कारवाईचा 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे समजते. त्यामुळे वाहतूक पोलीस केवळ हेल्मेटमधूनच जर 100 कोटीचा दंड पुणेकरांना ठोठावणार असतील तर हे एक पुण्यासाठी नवलच असणार आहे. सिग्नल बंद पडल्यानंतर आणि वाहतूक कोंडी झाल्यानंतर मात्र, यातून सुटका करण्यास कोणी येत नाही. त्यामुळे पुणेकरांचा त्रागा प्रचंड वाढतो.

आकडेवारी बाहेर पडू न देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न…

वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईची आकडेवारी बाहेर पडू नये, यासाठी वाहतूक विभागाने पुर्ण खबरदारी घेतली होती. त्यातही ही आकडेवारी माध्यमांच्या हाती लागू नये, यासाठी अतिवरिष्ठांनी सर्वांचीच कानउघडणी केली होती. त्यामुळे सर्वजन याची खबरदारी घेत होते.

पेंडीग दंडासाठी झाडाझडती…

पोलीस आयुक्तांच्या मनासारखी हेल्मेट कारवाई झाली. पण, पेंडीग दंडाचा आकडा पाहिल्यानंतर मात्र, आयुक्तांनी हा दंड वसूल करण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू केला. काही केल्या पेंडीग दंड कमी होत नसल्याने उपायुक्तांचा घाम फुटेपर्यंत झाडाझडती घेतली होती. पण काही केल्या हा पेंडीग दंड वसूल होत नसल्याने पोलीस आयुक्त निराश आहेत.

जानेवारी ते आजपर्यंत

— हेल्मेट कारवाई– 16 लाख
— एकूण दंड– 81 कोटी
— पेंडीग दंड– 59 कोटी
— वसूल दंड– 21 कोटी

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/