पुणे : ‘कायदेशीर’ बाबींचे पालन केल्यानेच मिरवणूक शांततेत आणि उत्साहात : पोलीस आयुक्त के. वेंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही वर्षांच्या विसर्जन मिरवणुकीचा अभ्यास करून केलेले नियोजन यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक दरवर्षी पेक्षा तीन तास अगोदर संपली. गणेश मंडळ आणि नागरिकांनी कायदेशीर बाबींचे पालन केल्यानेच मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली, असे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी सांगितले.

टिळक चौकातून सकाळी पावणेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीतील शेवटचे मंडळ गेल्यानंतर मध्यवर्ती शहरातील बंदोबस्त काढून घेण्यात आला. संभाजी पोलीस चौकीसमोर बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून पोलीस आयुक्त के. वेंकटेशम आणि सह आयुक्त डॉ. राजेंद्र शिसवे यांनी कौतुक केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना के. वेंकटेशम म्हणाले, की सर्व मंडळांनी आणि नागरिकांनी सहकार्य केले. विशेषतः कायदेशीर बाबींचे पालन केले गेले. त्यामुळे मिरवणूक अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडली.

मिरवणुकित विलंब टाळण्यासाठी पोलिसांनी मागील काही विसर्जन मिरवणुकीचा अभ्यास केला होता. त्यामुळे मिरवणूक विक्रमी वेळेत संपली. परंतु नेमका काय अभ्यास केला होता याचे स्पष्टीकरण देणे त्यांनी टाळले. केवळ ‘कायदेशीर’ बाबींचे पालन केले एवढेच मोघम उत्तर त्यांनी दिले.

आरोग्यविषयक वृत्त –