अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक उमाकांत पद्माकर पाटील (रा. बंजारा कॉलनी, खोडकपुरा) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. उमाकांत पाटील यांनी रविवारी (दि.22) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

उमाकांत पाटील यांची पोलीस दलातील मुख्यालयात नेमणूक झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. एसीबीने कारवाई करून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची तारीख आज (सोमवार) कोर्टात होती. त्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.

उमाकांत पाटील याची रविवारी रात्री घरगुती कारणास्तव घरच्यांसोबत वाद झाले होते. वाद झाल्यानंतर उमाकांत पाटील यांनी रात्री घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com

You might also like