भाजपा नगरसेवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूकीच्या काळात मुलाच्या नावावर केलेले घर परत स्वतःच्या नावावर करण्यासाठी भाजप नगरसेवक आणि पत्नी मध्ये वादावाद झाली. यावरुन नगरसेवकाने पत्नी आणि मुलाला मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक लक्ष्मण उंडे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने यमुना उंडे ( 44, रा. साई पार्क, दिघी) यांनी गुरुवारी (दि. 21) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशी अर्थात 14 फेब्रुवारी रोजी नगरसेवक लक्ष्मण उंडे यांनी आपला मुलगा दीपक यांना धमकी दिली.

निवडणुकीच्यावेळी राहते घर तुझ्या नावावर केले होते. आता ते माझ्या नावावर करून दे, नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला दिघी गावात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. तपास दिघी पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like