पोलिस चौकी समोरच 8 हजाराची लाच घेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी आणि ते प्रकरण मिटविण्यासाठी 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 8 हजार रूपये लाच म्हणून स्विकारणार्‍या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (सोमवारी) रात्री रंगेहाथ पकडले. संबंधित पोलिस हवालदाराविरूध्द इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण निवृत्‍ती सोनवणे (51, रा. पोलिस हवालदार, बावडा चौकी, इंदापूर पोलिस स्टेशन) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांच्याविरूध्द इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात मदत करण्यासाठी आणि प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस हवालदार प्रविण सोनवणे यांनी त्यांच्याकडे 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्‍त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. त्यामध्ये पोलिस हवालदार सोनवणे हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने बावडा पोलिस चौकीच्या समोर सापळा रचला. पोलिस हवालदार सोनवणे यांनी चौकी समोरील वडापाव सेंटरजवळ सरकारी पंचासमक्ष 8 हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर सोनवणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनशाम बळप, पोलिस हवालदार दिपक टिळेकर, वैभव गोसावी, अभिजीत राऊत आणि धनेश म्हेत्रे यांनी ही कारवाई केली.

Loading...
You might also like