पोलीस निरीक्षकासह हवालदाराला २५ हजारांची लाच घेताना अटक

अमरावती  : पोलीसनामा ऑनलाईन

गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी २५ हजारांची लाचेची मागणी करुन लाच स्विकारताना वाशिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय गोवर्धन पाटकर (वय-५१) आणि पोलीस हवालदार विजय जेमला राठोड (वय-५०) या दोघांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली.
[amazon_link asins=’B07944CZ7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c258c41-8112-11e8-ae1f-bff77157ee05′]

याप्रकरणी एका ४१ वर्षीय इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्यावर वाशिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक पाटकर आणि हवालदार राठोड यांनी २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा करुन आज पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. हवालदार राठोड याला २५ हजारांची लाच घेताने रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परीक्षेत्राच्या चेतना तिडके, पोलीस उप अधिक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जिवन भातुकले, पोलीस निरीक्षक रविंद्र जेधे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद धानोरकर, युवराज राठोड, पंकज बोरसे, अकबर हुसेन यांच्या पथकाने केली.