‘बेस्ट काँस्टेबल’ दुसऱ्या दिवशी ‘या’ कारणाने झाला अटक

हैदराबाद : वृत्तसंस्था – स्वातंत्र्य दिनानिमित्त तेलंगणा राज्यात एका पोलीस काँस्टेबलला त्याचे कर्तव्य, निष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे ‘बेस्ट काँस्टेबल’ म्हणून गौरविण्यात आले. त्याचे जागोजागी कौतुक केले गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली. पी तिरुपती रेड्डी असे या बेस्ट काँस्टेबलचे नाव आहे.

त्याचे झाले असे की, बेस्ट काँस्टेंबल म्हणून गौरव झाल्यानंतर पी. तिरुपती रेड्डी हा दुसऱ्या कामावर हजर झाला. बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर त्याने पकडला. त्याने या व्यापारी रमेश यांना ट्रॅक्टर जप्त करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे १७ हजार रुपयांची लाच मागितली. व्यापाऱ्याने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून व्यापाऱ्यांकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना पी. तिरुपती रेड्डी याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –