पत्नीची हत्या करुन पोलीस काँस्टेबलची आत्महत्या

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या गरियाबंद येथे एका पोलीस काँस्टेबलने आपल्या पत्नीला गोळी मारुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
रमेश सेन असे या पोलीस काँस्टेबल याचे नाव आहे. रमेश सेन याची गरियाबंदमधील उपजेल येथे नेमणूक करण्यात आली होती. रमेश सेन याचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची येथे नेमणूक झाली होती. सकाळी १० वाजता तो ड्युटीवर येण्याची अपेक्षा होती. मात्र, तो न आल्याने त्याच्या सहकाऱ्याने फोन केला पण तोही त्याने उचलला नाही.

त्यामुळे ड्युटी संपल्यावर रात्री उशिरा त्याचा सहकारी रमेश याच्या घरी गेली. पण दरवाजा वाजवूनही तो उघडला गेला नाही. तेव्हा त्याने स्थानिक पोलिसांना बोलावले. पोलिसांनी रमेशच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर आतील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले. रमेश फरशीवर पडले होते. त्यांच्याजवळच त्यांचे सर्व्हिस रिव्हाल्वर पडले होते. पलंगावर त्यांच्या पत्नीचा मृतदेह होता. रमेश याने अगोदर पत्नीवर गोळी झाडून तिचा खुन केला व त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. मात्र, यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

जाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे !

केळी खाण्याचे १० फायदे, जाणून घ्या

मक्याचा उपमा खाण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या

मुलांना नैसर्गिकरित्या गोरे करतात ‘हे’ ५ घरगुती उपाय; जाणून घ्या

हिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या