पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक राहुल दत्ता रसाळ (वय-४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तीन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील लष्कर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0abf186b-c64c-11e8-879c-8f9b7d940021′]

पोलीस नाईक राहुल रसाळ हे मुळचे मिरज तालुक्यातील समडोळी गावचे रहिवाशी होते. काही वर्षांपूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर ते पोलीस दलात दाखल झाले होते. रसाळ हे पत्नी, दोन मुली, मुलासमवेत विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीत राहत होते.
सांगली शहर पोलिस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होते. पाच दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याने त्यांना सांगलीतील खासगी रूग्णालयात दाखल केले होते.

[amazon_link asins=’B00GZ61W4G,B06XPF43DD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2373dce3-c64c-11e8-a86d-a3b26e8842e6′]

तीन दिवसांपूर्वीच त्यांना पुण्यातील लष्कराच्या रूग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रसाळ यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंपरी : खदाणात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

जाहिरात.