अखेर ‘तो’ पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्‍तांची तडकाफडकी कारवाई

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात एमडी तस्कर आबू सोबतची मैत्री एका पोलीस शिपायाला चांगलीच महागात पडली. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी पोलीस शिपाई जयंता शेलोट याला बडतर्फ केले. पोलीस कर्मचारी जयंता शेलोट याचे आबूच्या मोबाईलमध्ये वारंवार कॉल्स आढळले. पोलीस अंमली पदार्थाच्या तस्करीत आबूला अप्रत्यक्ष सहकार्य करीत असल्याचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी जयंता हा आबू याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तडीपार गुंड व आबू यांच्याबरोबर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओची गंभीर दखल घेत त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरु होती. चौकशीनंतर त्याला मंगळवारी बडतर्फ करण्यात आले.

शेलोट सहा महिन्यात दोनदा निलंबित –

जयंता शेलोट गेल्या सहा महिन्यात दोनदा निलंबित झाला आहे. यापूर्वी आबूच्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जयंताला निलंबित करण्यात आले होते. तो आबूच्या वारंवार संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर त्याला दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले होते.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like