पोलिस कर्मचार्‍यानं मारली उडी कालव्यात, WhatsApp वर लिहीलं – ‘आत्म्यामुळं आहे परेशान’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – एका कालव्यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडतो. भावाला व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज येतो की एक आत्मा त्याला त्रास देत आहे आणि यामुळेच तो कालव्यात उडी मारून आत्महत्या करत आहे. या धक्कादायक हत्येचे हे गूढ सोडविणे आता पोलिसांसाठी कठीण होत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील आहे.

खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या इंदिरा सागर धरणाच्या मुख्य नर्मदा कालव्यात सोमवारी सकाळी एका पोलिस हवालदाराने उडी मारली होती.

नर्मदा कालव्यात उडी मारण्यापूर्वी पोलिस कर्मचाऱ्याने आपली बाइक कालव्याच्या किनाऱ्यावर उभी करून आपल्या भावाला व्हाट्सऍपवरून कालव्यात उडी मारुन जीव देत असल्याचा मेसेज देखील केला ज्यात त्याने आयुष्याला कंटाळले असल्याचा आणि आत्म्यामुळे त्रस्त होण्याविषयी लिहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल राकेश पाटीदार हा बडवानी जिल्ह्यातील सेंधवा ग्रामीण पोलिस ठाण्यात तैनात होता आणि सुट्टी घेऊन खरगोनमधील सुखपुरी येथील आपल्या घरी आला होता.

नर्मदा कालव्यात उडी मारताना पाहून तेथून जाणाऱ्या लोकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती मेणगाव पोलीस ठाण्यात दिली. यानंतर कुटुंबीयांसह पोलिस अधिकारी टीमसह घटनास्थळी दाखल झाले.

या टीमने शोध सुरू केला, पण कालव्यात पाण्याचा ओघ जास्त असल्याने २४ तासानंतरही पथकाला पोलिस कर्मचाऱ्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. सुमारे १० किलोमीटर क्षेत्रात शोध घेतला असता त्यानंतर मंगळवारी दुपारी पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला.