पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा ‘प्रताप’, दारु न दिल्याने केली ‘तोडफोड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस असल्याचे सांगूनही त्याच्या सहकाऱ्याला दारु न दिल्याने एका पोलीस शिपायाने हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये तोडफोड केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पोलीस शिपाई अक्षय धुमाळ व त्याचे सहकारी अजय खोत व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हिंजवडीमधील हॉटेल एफएमएल लॉन्समध्ये रविवारी रात्री सव्वा वाजता घडली होती.

याप्रकरणी हॉटेलचे रामकिसन खैरनार (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हॉटेल बंद झाले असताना मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास पोलीस शिपाई अक्षय धुमाळ हा तिघांना घेऊन हॉटेलमध्ये आला. त्याने खैरनार यांना आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला त्या दिवशी दारू दिली नाही. असे म्हणून मारहाण व शिवीगाळ केली. जाताना हॉटेलच्या बाजूच्या चायनीज दुकानाची लाथ मारुन काच फोडली. सहायक पोलीस निरीक्षक भवारी तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like