पोलिस स्टेशन मध्येच कर्मचाऱ्यानं गोळी झाडून केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्ली पोलीस दलातील पोलीस काँस्टेबल तैनात पारुन त्यागी यांनी आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. दिल्लीतील धौला कुंआ पोलीस ठाण्यात ही घटना घडली. तैनात त्यागी यांची धौला कुंओ पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती.

पोलीस ठाण्यातील एका खोलीत तैनात त्यागी याने स्वत: जवळच्या रिव्हॉल्व्हरवरमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. तेव्हा त्यागी पडलेला दिसला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यागी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.

दिल्ली पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याची गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. ऑक्टोंबरमध्ये दहशतवाद विरोधी पथकातील एका काँस्टेबलने अशाच प्रकारे आत्महत्या केली होती. तर पश्चिम दिल्लीच्या हरी नगर परिसरात एका काँस्टेबलने आपल्या राहत्या घरी स्वत:च्या पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/