आठवलेंसमोर अवतरला कवी पोलीस, कवितेतून ऐकवली दुष्काळाची दाहकता

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता राज्यातच नाही तर देशात चर्चेच्या ठरतात. मात्र लातूर मधील औसा तालुक्यात दुष्काळ पाहणीदरम्यान आठवले यांना ‘शेरास सव्वाशेर’ मिळाला. दुष्काळ पाहणी दरम्यान बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस शिपायाने त्यांच्याच शैलीत त्यांना कविता म्हणून दाखवली.

पोलीस कर्मचारी दिलीप लोधे यांनी दुष्काळाची दाहकता कवितेमधून रामदास आठवले यांच्यासमोर मांडली. यावेळी रामदास आठवले यांनी त्यांची कविता शांतपणे उभे राहून ऐकून घेतली.

पोलीस कर्मचारी दिलीप लोधे यांनी सादर केलेली कविता…
म्हणजे तुमचा कोणता का असेना पक्ष,
आम्ही बंदोबस्तात आहोत दक्ष,
आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे घाला लक्ष.

तुम्ही मोठे आणि मी एक छोटा कवी,
तुम्ही मोठे आणि मी एक छोटा कवी,
ही बाब नाही नवी,
परंतु आजच्या दुष्काळग्रस्त काळात शेतकऱ्यांना तुमची साथ हवी.
तुम्ही करत असतात दुष्काळाची पाहणी,
पण तुम्हालाही माहितीत कशी असते शेतकऱ्यांची राहणी…
अशा पद्धतीने पोलिसाने आठवले यांना कविता ऐकवली. पोलिसाच्या कवितेला रसिक मनाच्या आठवले यांनीही दाद दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like