‘तो’ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पैसे घेतानाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बाळकृष्ण दौंड यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलिस दलाची सूत्रे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हाती घेतल्यापासून त्यांनी पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. सिंधू हे पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमक असताना चार दिवसापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारी पैसे घेतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेऊन सिंधू यांनी त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले.

त्यानंतर काल पुन्हा एकदा तोफखाना पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचे मटका व्यवसायिकाकडून पैसे घेतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात मटका बुकी व पोलीस कर्मचारी शहरातील काही मटका व्यवसायिकांची नावे घेत आहेत. सदर व्यक्ती शहरातील बडे मटका बुकी असल्याचे सांगितले जाते. पैसे घेतानाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिस हवालदार दौंड यास पोलीस अधीक्षक शिंदे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

Loading...
You might also like