दारुसाठी पैसे न दिल्याने पोलीस कर्मचार्‍याची हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पोलीस शिपायाने हॉटेल व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच शिपायाने गल्ल्यातील रक्कम काढून घेत जादा पैशांची मागणी केली. हॉटेल व्यवसायिकाने दिलेल्या फिर्याद नुसार शहर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास शहर बस स्थानक समोर ओम साईराम नावाचे हॉटेल आहे. हे हॉटेल सुनिल शेषराव राजगुरु यांनी भाडेतत्वावर घेतले आहे. रविवारी दुपारी पोलीस मुख्यालयात कार्यरत असणारे पोलीस शिपाई कृष्णा उत्तमराव पाटील हे हॉटेलमध्ये आले. त्यांना राजगुरु यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावेळी हॉटेल चालक राजगुरु यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून कृष्णा पाटील याने रागाच्या भरात हॉटेल व्यवसायिकास जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर कृष्णा पाटील याने गल्ल्यातील ४०० रुपये बळजबरीने काढून घेऊन निघून गेला. काही वेळाने परत हॉटेलमध्ये येऊन त्याने पुन्हा ५०० रुपयांची मागणी केली. हॉटेल व्यवसायिक राजगुरु आणि त्यांची पत्नी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात तक्रार देण्यास गेले असता, त्या ठिकाणी देखील कृष्णा पाटील याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. राजगुरु यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य