‘तो’ बेपत्ता पोलीस कर्मचारी आढळला अत्यावस्थेत

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन-वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाल कंटाळून सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी देऊन बपत्ता झालेला पोलीस कॉन्स्टेबलचा शोध लागला आहे. बेपत्ता पोलीस कर्मचारी भाळवणी येथे अत्यावस्थेत आढळून आला आहे. त्याला तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याने विषारी औषध पिल्याची शंका व्यक्त होत आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याची धमकी सोशल मीडीयावर चार दिवसांपूर्वी दिली होती. यानंतर पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याने सोलापूर पोलीस दलात खळबळ उडाली. बेपत्ता पोलीस कर्मचारी राहूल जगताप पंढरपूर पोलीस ठाण्यात कार्य़रत आहे. राहुल जगताप यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळलो आहे असे सांगत आत्महत्येची धमकी दिली होती. यानंतर राहुल जगताप बेपत्ता झाल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. त्याचा पोलीस देखील शोध घेत होते. मात्र, तो सापडत नव्हता आज तो सापडाल पण अत्यावस्थेत.

अनेकदा पोलीस खात्यात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी स्वतःची बदली करुन घेतात. परंतु काही वेळा कर्मचारी टोकाची भूमिकादेखील घेतात. अशीच घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व एक कर्मचारी वारंवार त्रास देत असून त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे धमकीपत्र कॉन्स्टेबल राहुल जगताप याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. धमकीपत्र व्हायरल झाल्यानंतर राहुल बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि पोलीस विभागाने त्याचा शोध सुरु केला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us