पोलिसांना हवं तिथं पोस्टींग, आयुक्‍तांकडून ६०० कर्मचार्‍यांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पाहिजे ते पोलिस ठाणे मिळावे यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘लेन देन’ होते. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि मनापासून काम करायला उत्साह निर्माण व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी नवीन ‘फंडा’ वापरला. पोलीस आयुक्तालयात कर्मचाऱ्यांच्या दरबार घेऊन त्यांना हवे असणाऱ्या पोलिस ठाण्यात बदली देण्यात आली. यामुळे अवघ्या दोन तासात ६०० पोलीस कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या.

नवीन पोलीस चौक्या आणि गुन्हे शाखेच्या तीन युनिट मध्ये कर्मचा-यांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी बदल्यांसाठी इच्छुक असणा-या सर्व पोलीस कर्मचा-यांचा दरबार भरवून बदल्या करून दिल्या. पोलीस खात्यात बदल्यांसाठी बड्या हस्तींचा संपर्क आणि आर्थिक ताकद लावली जाते. मात्र आज पोलिस आयुक्तांनी मैदानावर बोलावून थेट बदल्या केल्या. यामुळे कर्मचा-यांमध्ये उत्साह वाढला आहे.

एकाच पोलीस ठाण्यात अनेक वर्ष काम केल्याने कर्मचा-यांनी आपले गड स्थापन केले होते. हे गड पाडण्यासाठी आजवर एखाद्या पोलीस ठाण्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष सेवा केलेल्या कर्मचा-यांची थेट नियंत्रण कक्षात अथवा दुस-या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेला काम केलेल्या कर्मचा-यांना पुन्हा गुन्हे शाखेत काम मिळणार नाही. त्यामुळे नव्या चेह-यांना गुन्हे शाखेत काम करण्याची संधी मिळणार आहे. पोलिस आयुक्तांच्या या निर्णयामुळे पोलिस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सिनेजगत

‘या’ 4 दिग्गज अभिनेत्यांच्या शरिरात ‘ही’ कमरता, कधीही नाही आले लक्ष्यात कोणाच्या

‘हे’ आहेत बॉलिवूडमधील ‘५’ साऊथ रिमेक सिनेमे, आता ‘कबीर सिंह’

 

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

#YogaDay2019 : ‘या’ आसनाने स्वभावात होतात सकारात्मक 

#YogaDay2019 : मनशांतीसाठी योगासन हा सर्वात चांगला पर्याय

 #YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’

#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’

#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच