Police Crime News | पोलिस दलातील महिलेचे विवस्त्र फोटो व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – बुलढाणा पोलीस दलात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याचे विवस्त्र फोटो (Nude Photos) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) केल्याची घटना उघडकीस (Police Crime News) आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (Police Crime News) दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,१७ ते १८ जुलैच्या दरम्यान सोशल मीडियावर पोलीस दलात कार्यरत एका महिलेचे खासगी फोटो व्हायरल झाले होते. ही बाब संबंधीत महिलेस कळताच, तिला धक्का बसला. तिने तत्काळ पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ज्या मोबाइल क्रमांकावरून हे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत त्या विरोधात विरोधात विनयभंगासह, आयटी अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकऱ्यानी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. त्याचबरोबर हा तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले. तर या संदर्भात सायबर सेलचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, अनुषंगिक कागदपत्रे तयार झाली असतील. मात्र, अद्याप आपल्यापर्यंत ती पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा

Pune News | व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये इंडक्शन प्रोग्रॅम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Police Crime News | nude photo lady police officer goes viral social media in buldhana district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update