सिंहगड रोड परिसरातील सराईताला पोलिसांनी केले दोन वर्षासाठी हद्दपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगाराला शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत.

सतीश संजय सुतार (वय २६, रा. जिजाई अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे) असे हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सतीश सुतार याचेविरोधात जबरी चोरीचे गुन्हे आहेत. दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झाली होती.
[amazon_link asins=’B071RQWJ3Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dcdbb765-96f9-11e8-8c61-3fdf86248b5a’]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश सुतार हा सिंहगड रोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात जबरी चोरीचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळात शहरात मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव साजरे होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार सिंहगड पोलीसांनी सतीश सुतार याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून तो परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देत त्यांनी आदेश काढले आहेत.