धक्‍कादायक ! पिडीत महिला म्हणाली, ‘देवा शपथ’, माझ्यावर पोलिसांनी ‘आळीपाळीने’ बलात्कार केला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जयपूर शहरात युवकाच्या मृत्यूप्रकरणी आणि त्याच्या वाहिनीवर  बलात्कार प्रकरणी नवीन खुलासा समोर आला आहे. या घटनेतील पीडितेने बोलताना सांगितले कि, मी शपथ घेऊन सांगत आहे कि, पोलिसांनी माझ्यावर वेळोवेळी बलात्कार केला. माध्यमांतून समोर आलेल्या माहितीनुसार, या पीडित महिलेने म्हटले कि, ज्या वेळी पोलीस ठाण्यात महिला कर्मचारी आली आणि तिने माझी स्थिती पहिली त्यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना ओरडली. त्याचबरोबर पुढे तिने सांगितले कि, मला चार दिवस बंधक बनवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांनी मला मारहाण करत तीन दिवस माझ्यावर बलात्कार केला. त्यांनी बलात्काराबरोबरच माझ्यावर शारीरिक अत्याचार करत माझ्या हातांची आणि पायांची नखे देखील उपटली.

एकटी असताना केले अत्याचार

पीडितेने सांगितले कि, महिला कर्मचारी गेल्यानंतर ती आतमध्ये झोपली असताना कर्मचाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर तिला मोठ्या प्रमाणात त्रास देऊन तिच्या  हातांची आणि पायांची नखे देखील उपटली. त्यानंतर सकाळी महिला कर्मचारी आल्यानंतर तिने माझी परिस्थिती पहिली आणि मला उपचारासाठी दाखल केले.

एफएसएल वर अंतिम निर्णय

एसएमएस हॉस्पिटलच्या मेडिकल प्रशासनाने तिच्यावर बलात्कार झाला आहे कि नाही याचा निर्णय  एफएसएल रिपोर्टवर सोडला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात डॉक्टरांनी अनेक नमुने घेतले असून या रिपोर्टची वाट पहिली जात आहे.

Loading...
You might also like