Video : ‘रॅपर’ बादशाह आणि नेहा कक्करच्या गाण्यावर फॉरेनच्या पोलिसांचा तुफान डान्स ! इंडियन स्टेप्सनं वेधलं लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून, अटेंशन घेताना दिसत आहे. यात काही पोलीस अनेक बॉलिवूड साँगवर थिरकताना दिसत आहे. यात रॅपर बादशाह (Badshah) याचं लडकी ब्यूटिफुल कर गयी चूल आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) हिनं गायलेल्या काला चश्मा या गाण्यांचाही समावेश आहे. सध्या हा व्हिडिओ सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओत दिसणाऱ्या पोलिसांबद्दल बोलायचं झालं तर हे पोलीस न्यूझीलंडमधील पोलीस (New Zealand Police) आहे. यात महिला आणि पुरुष असा दोघांचाही समावेश आहे. सध्या ग्रुप डान्स सोशलवर चर्चेत आहे. त्यांनी बॉलिवूड साँगवर स्टेप्स केल्या आहेत.

न्यूझीलंड पोलीस प्रशासनानं दिवाळीनिमित्त एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात पोलिसांनी हा डान्स केला आहे. यात त्यांनी इंडियन स्टेप्सही केल्या आहेत, ज्या विशेष लक्ष वेधून घेत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशलवर शेअर केला जात आहे. अनेकांनी यावर कमेंट करत या डान्सचं कौतुक केलं आहे. काही तासात या व्हिओला हजोरा नेटकऱ्यांनी पाहिलं आहे. काहींना हा व्हिडिओ एवढा आवडला आहे की, त्यांनी हा व्हिडिओ शेअरदेखील केला आहे.

You might also like