पुण्यातील महिला पोलिसाच्या मुलीचे दहावीत उत्तुंग यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खरं तर पोलीस दल म्हटलं की तारेवरची कसरत, अशा व्यस्त कर्तव्यापुढे आपल्या परिवाराला देखील पुरेसा वेळ पोलीस कर्मचाऱ्यांना देता येत नाही. मात्र अगदी खडतर परिस्थिवर मात करत क्षितिजा जाधव या मुलीने दहावीच्या परिक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. क्षीतीजा ही पोलीस हवालदार वैशाली जाधव यांची मुलगी आहे.

वैशाली जाधव या सध्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत आहेत. क्षितिजा जाधव हिन दहावीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेत 93 टक्के मार्क मिळवले आहेत. क्षीतीजा ही सुरुवातीपासूनच मेहनती व कष्टाळू मुलगी आहे. तिच्या यशाच्या पाठिमागे तिच्या घरच्यांचा मोठा वाटा असल्याचे ती सांगते.

दहावीच्या परीक्षा दरम्यान कोरोना विषाणूचा प्रसार राज्यात सुरु झाला. त्यामुळे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांना रात्रंदिवस कर्तव्य पार पाडावे लागत होते. पोलीस हवालदार वैशाली जाधव यांना देखील कर्तव्य पार पाडत आपल्या मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागत होते. वैशाली जाधव यांनी पोलीस दलाची ड्युटी करून मिळेल त्यावेळेत क्षीतिजाचा अभ्यास घेत होत्या. त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले. क्षीतीजा आणि वैशाली जाधव यांचे पोलीस दलाकडून कौतुक होत आहे. तसेच क्षीतीजाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.