गोमास घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पंढरपूर – जेजुरी मार्गावरील निरानजीकची घटना महिंद्र पिकअप गाडीत सापडले अडीच टन गोमास. समस्त हिंदू आघाडी आणि बजरंग दल कार्यर्त्यानी पहाटे पकडली पिकअप गाडी पालखी मार्ग पंढरपूर – जेजुरी मार्गावरील नीरा नजीक पूर्ण पत्र्याची बॉडी पॅक महिंद्र पिकअप गाडी नबर एम. एच. ४२, बी. ५०९४ मध्ये गोमास असल्याचे खात्री लायक माहिती गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना मिळताच समस्त हिंदू आघाडी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मोजे निरा गाव हद्द लोणंद नाक्या जवळ फलटण कडून येणाऱ्या गाडीला आडवून गोमास घेऊन जाणार्यांना पकडून पोलिसांच्या स्वधीन केले.

याची फिर्याद गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी जेजुरी पोलीस स्थानकात दिली असता तातडीने पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी कारवाई करून आरोपी बिलाला कुरेशी, वसीम कुरेशी राहणार फलटण आणि संतोष भगवान आचारी राहणार हडपसर वैद्वाडी, सय्यद आली हबीब शेख राहणार पाटील इस्टेट शिवाजी नगर या आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली, सातारा येथून कसाई मोहल्यातून गाई व बैलाचे कापलेले मांस पशुसंवर्धन विभागाची परवानगी न घेता गोवंश कापणे, गोमांसाच्या विक्रीस बंदी असताना, गोमांसाच्या वाहतूक करताना चालक व क्लिनर मिळून आल्याने गाई व बैल कापणारे व गोमांस विकत घेणारे तसेच टेम्पो मालकाविरुद्ध फिर्यादीने फिर्याद दिल्याने गुन्हा रजिस्टरी दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास सहा. फौजदार गायकवाड करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/