मद्यधुंद पीएमपीएल चालक पोलिसांच्या ताब्यात, वाचले ४० प्रवाशांचे प्राण

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पीएमपीएमएलचा प्रवास सुरशित प्रवास अशी जाहिरातबाजी करणाऱ्या पीएमपीएमएल बसेसचा प्रवास खरच सुरशित आहे का असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. कात्रज – कोथरुड बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोनदा अपघात होता होता वाचला. त्यावेळी बसमध्ये ४० प्रवाशी प्रवास करत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9f30770-c49e-11e8-bacf-9974e4c8574e’]

बस चालक चंद्रशेखर अहिरे हा कात्रज येथून बस घेऊन कोथरुडच्या दिशेने जात होता. गाडी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा अहिरे याचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र, प्रवाशांनी याकडे दुर्लक्ष केले. बस काही अंतर पुढे गेली असता अहिरे हा बेफिकीरपणे गाडी चालवू लागला. त्यामुळे प्रवाशांना बस चालक चंद्रशेखर अहिरे याचा संशय आल्याने ही बस पद्मावतीजवळ थांबवली. प्रवाशांनी बस चालकाकडे जाब विचारला असता त्याला बोलता देखील येत नव्हते. अहिरे हा मद्यपान करुन बस चालवत असल्याचे दिसून आले. काही प्रवाशांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अमोल दरेकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळून घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बस चालक चंद्रशेखर अहिरे याला ताब्यात घेतले.
[amazon_link asins=’B01KITZRBE,B01KITZKDE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4e22c57-c49e-11e8-a704-cd4b47a07e9e’]

प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ होता होता टळला. जर प्रवाशांनी याकडे दुर्लक्ष केले असते तर काही वर्षांपूर्वी एसटी बसचालक संतोष माने याने केलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली असती. पुण्यातील सुरक्षीत सेवा म्हणून हजारो नागरिक बसने प्रवस करतात. मात्र, मद्यपी, बेशिस्त, उर्मट पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांमुळे ही सेवा खरच सुरक्षित आहे का असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी सांगवी येथील वयोवृद्ध दांपत्यास दात पाडण्याची धमकी देणाऱ्या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता या मद्यपी चालकावर पीएमपीएमएल प्रशासन काय कारवाई करणार हे पहावे लागेल.

काेल्हापूरच्या गाेकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत चपलांचा पाऊस

काही वर्षांपूर्वी एसटी बसचालक संतोष माने यानी वेडाच्या भरात रस्त्यावरून पायी चालणाऱ्या सामान्य नागरिकांना आपल्या बस खाली चिरडले होते. त्या घटनेचे व्रण पुणेकरांच्या मनामध्ये अजूनही ताजे असतानाच आजची ही घटना घडल्याने पीएमपीएल प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. संतोष मानेच्या गंभीर घटनेनंतर देखील प्रशासन अजूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेला दुय्यम स्थान देत असल्याचे या घटनेद्वारे स्पष्ट होते.
जाहिरात.