धमकी देऊन बलात्कार करणारा पोलीस कर्मचारी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नास नकार दिल्याने धमकावून जबरदस्तीने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर लग्नास नकार देऊन जातीवरुन शिवीगाळ करणाऱ्या पोलीस शिपायाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. शुभम गजानन मोहिते (रा़ पाटीलनगर, धनकवडी) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. शुभम मोहिते हा पुणे शहर पोलीस दलातील मोटार वाहन परिवहन विभागात नियुक्तीला आहे.

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन दिघी पोलिसांनी मोहिते याच्याविरुद्ध बलात्कारासह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी शुभम मोहितेपेक्षा वयाने मोठी आहे. असे असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. २०१६ पासून ते एकमेकांना ओळखत होते. मोहिते याने या तरुणीला लग्नाची मागणी घातली. त्याला तिने नकार दिल्याने मोहिते याने तिचे वडिल व बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. तिला फिरायला घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर या तरुणीने त्याला लग्नाविषयी विचारल्यावर तो टाळाटाळ करुन लागला. तिने तक्रार केल्यास तिचे वडिल व बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याची धमकी दिली.

याबाबत तिने मोहिते याच्या आई व बहिणीला सांगितले असता त्यांनी तू खालच्या जातीची असून असली घाण घरात नको असे म्हणून जातीवाचक उल्लेख केला. मोहितेचे मेव्हण्यानेही या तरुणीच्या अंगावर धावून जाऊन तिच्या हाताला धरुन ढकलून दिले. या प्रकारानंतर मोहिते हा आपल्याशी लग्न करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर आता या तरुणीने दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम मोहिते याला अटक केली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like