राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात गर्दीत पाकीट मारणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईकातील विवाह सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्या गर्दीत एका चोरट्याने गर्दीचा फायदा घेत तीन कार्यकर्त्यांची पाकीट चोरले आहे. हे प्रकरण एका कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शुक्रवारी सकाळी पाथर्डी फाट्याजवळ हॉटेल एक्स्प्रेस इन येथे नेत्याची आणि कार्यकर्त्याची गर्दी झाली होती.

त्यावेळी गर्दी ठिकाणी पोलीस बंदोबस्तदेखील उपस्थित होता. संशयित पाकीट मारत असताना एका कार्यकर्त्याच्या लक्षात आले. आणि त्यांनी इकडे तिकडे बघितल्यावर एका व्यक्तीवर त्याला संशय आला. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर तो व्यक्ती पलायन होऊ लागताच तेथील कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्याच्याकडे पाकीट न्हवते त्याने पाकीट फेकून दिले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ह्या आधीही अशी घटना घडली होती तर आता तीन कार्यकर्त्यांचे पाकीट चोरीला गेले असं कार्यकत्र्यांनी सांगितलं आहे. तसेच या संशयीत व्यक्तीची तेथील इंदिरानगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.