TikTok व्हिडीओसाठी काहीपण ! वडिलांच्या गाडीवर लाल दिवा लावल्यानं खावी लागली जेलची हवा

पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर झळकण्यासाठी अनेकांकडून नानाविध क्लृप्ती लढविल्या जात आहेत. असाच एक धक्कादायक पृकार उत्तर प्रदेशात घडला आहे. टिकटॉकच्या व्हिडिओसाठी एका 17 वर्षाच्या मुलाने वडिलांच्या मोटारीवर सरकारी लाल दिवा लावून भटकंती केली. मात्रा, पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन सुधारगृहात पाठविले आहे.

देशात झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी आज अनेक तरुण सोशल नेटवर्किंगचा आधार घेत आहेत. यामध्ये अगदी युट्यूबपासून ते ‘टिकटॉक’सारख्या नवीन माध्यमाचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील गुरुग्राममध्ये नुकताच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका 17 वर्षीय तरुणाला टीकटॉक व्हिडिओच्या नादात तुरुंगाची हवा खावी लागली आहे. त्याने वडिलांच्या वोल्सवॅगन गाडीवर सरकारी लाल दिवा लावून फिरत होता.

या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेउन कारवाई केली. तरुणाने गाड्यांशी संबंधित सामान मिळणार्‍या एका दुकानातून हा लाल दिवा विकत घेतला होता. ‘लाल बत्तीवाली गाडी के थे सपने मेरे’ या हरयाणी गाण्यावर ‘टिकटॉक’ व्हिडिओ बनवण्यासाठी या मुलाने हा लाल दिवा विकत घेतल्याची कबुली दिली आहे. केंद्राच्या नवीन नियमांप्रमाणे लाल दिव्यांच्या वापर आता अगदीच मर्यादित गाड्यांसाठी करण्यात येते. आपत्कालीन वाहने यामध्ये रुग्णवाहिका, आग्निशामक दल, पोलिसांच्या गाड्यांवरच हे लाल दिवे लावण्याचा परवानगी दिली आहे. शनिवारी दुपारी हा तरुण गाडीवर लाल दिवा लावून ‘टिक-टॉक’ व्हिडिओ शूट करत फिरत होता त्यावेळी त्याला पोलिसांनी अतुल कटारिया चौकात अडवले.