‘कृष्णा’साठी तो पोलीस झाला ‘वासुदेव’

बडोदा : वृत्तसंस्था – कंसाच्या तावडीत सापडू नये, म्हणून नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला वासुदेवने टोपलीत ठेवून पुराने ओसंडून वाहत असतानाही नदी पार केली. गळ्यापर्यंतच्या पाण्यातून वासुदेव जात असताना बाळ कृष्णाच्या पायाला पाणी लागताच पाणी कमी झाले व त्यानंतर वासुदेवाने कृष्णाला  मथुरेला पोहचविले, ही व त्यापुढील कथा सर्वांनाच माहिती असेल. अशी एक घटना बडोद्यात घडली आहे. पुराने वेढलेल्या घरातून चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने टबमध्ये बाळाला ठेवून गळ्याऐवढ्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चावडा असे त्यांचे नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या धुवांधार पावसामुळे बडोदा शहरातील जनजीवन अस्थाव्यस्त झाले आहे. बडोद्यामध्ये एकाच दिवसात ५०० मिमी पाऊस पडला. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून असंख्य लोक घरात अडकून पडले आहेत. या घटनेविषयी गोविंंद चावडा यांनी सांगितले की, मी आणि माझी टीम देवीपुरा भागात पोहचण्यासाठी पुराच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यावरुन गेलो. सुरक्षेसाठी आम्ही एका खांबाला दोरी बांधली होती. लोक या दोरीला धरुन पुढे येऊ शकतील. आम्हाला माहिती मिळाली की, एक बालक व त्याची आई घरात अडकली आहे. मी त्या घरात पोहचलो.  पाणी गळ्यापर्यंत आले होते. त्यामुळे हातात मुलाला घेणे शक्य नव्हते. महिलेकडून एक टब घेतला. बेडशिट घेऊन टबमध्ये ठेवले. त्यावर या बालकाला ठेवल. आणि गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यातून सुमारे दीड किलोमीटर चालत मुलाला सुरक्षितपणे बाहेर घेऊन आलो.

गळ्या ऐवढ्या पाण्यातून टबमध्ये बालकाला ठेवून चावडा हे जात असताना इमारतींवर स्वत: अडकून पडलेल्या कोणीतरी त्यांचा हा फोटो काढला व व्हायरल केला. चावडा यांचा हा फोटो पाहून हजारो लोकांनी त्याला लाईक करुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आह.

आरोग्यविषयक वृत्त –