गुटखा जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही; नागपूर खंडपीठाचा आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 

गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. अशी बंदी असतानाही गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे किंवा साठा करणाऱ्यांवर छापा टाकून ते जप्त करण्याचे कुठलेही अधिकार पोलिसांना नाहीत, असा महत्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती देशपांडे आणि न्यायमूर्ती उपाध्याय यांनी नुकताच दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारित हा विषय येतो.

जाहीरात

दरम्यान, खंडपीठाच्या या आदेशामुळे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या संदर्भात पोलिसांनी आजपर्यंत केलेल्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यासंदर्भात वाहिद खान यांनी याचिका दाखल केली होती. वाहिद खान यांच्यावतीने अ‍ॅड. शाम मेहता यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तर सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. नितीन रेडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. अकोला शहरात वाहिद खान यांचे पान सेंटर आहे. या पान सेंटरवर पोलिसांनी वेळोवेळी धाडी टाकल्या होत्या. पोलिसांच्या या कारवाईविरोधात वाहिद खान यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. आपल्या व्यवसायात पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, यासाठी दिलासा द्यावा, असे या याचिकेत म्हटले होते. विभागीय पोलीस आयुक्त आणि विभागीय पोलीस अधीक्षक या दोन वरिष्ठ पोलिसांच्या अधिनस्त असलेल्या कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर छापा टाकून जप्त करण्याची कारवाई करू नये, असा महत्वपूर्ण निकाल देत न्यायालयाने सदरची याचिका निकाली काढली आहे.

[amazon_link asins=’B074DXB9SB,B071R2KKMZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’45cbdd35-b192-11e8-8687-af1a96e808b3′]

सर्वोच्च न्यायालयात आता महिला न्यायमूर्तींचे खंडपीठ