ग्रामीण पोलिसांचा ‘ड्रोन कॅमेऱ्या’ने आंदोलनावर ‘वॉच’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (दि.9 संपूर्ण राज्यभर बंद।पुकारलेला असून आंदोलन होत आहे. जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून अनुचित प्रकारांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी आंदोलनावर ‘ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे’ नजर ठेवली जात आहे. एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला व पीएमपीच  प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात आली असुन शहर तसेच हद्दीबाहेरील अनेक मार्ग बंद  आहे. मराठा संघटनांनी आजचा बंद शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

पोलिस प्रशासनाने दक्षता म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व आंदोलनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. संपूर्ण जिल्हा पोलिस अधीक्षक जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. सर्व पोलिस ठाण्यांना योग्य दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B071JWBFDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8614871e-9b93-11e8-a09d-1d0e6fef524e’]

दोलनादरम्यान काही समाजकंटकांकडून एसटी बसेस टार्गेट करून दगडफेक केली जाते. त्यामुळे दक्षता म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय विभाग नियंत्रकांनी घेतला आहे. तसे जिल्ह्यातील सर्व आगारप्रमुखांना कळविण्यात आले आहे. डेपोच्या प्रवेशद्वारावर पोलिस कर्मचारी व महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त राहणार आहेत.
[amazon_link asins=’B071ZYSHT5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ad5da282-9b94-11e8-83ac-ab6e3152a3d3′]

पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनंतर सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याने आंदोलनावर वॉच ठेवले जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांनी उपलब्ध असतील तेवढ्या ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे.