पुणे : 50 हजाराची लाच घेताना उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यास 50 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब भीमराव जाधव (54) आणि पोलीस कर्मचारी अजिक्य लहू कदम (28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जाधव आणि कदम हे बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्या भावावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक पूर्व जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी दोघांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रविवारी रात्री पोलीस ठाण्याच्या परिसरात तडजोडी अंती 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/